तुमच्या पुर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता? मलिकांचा भाजपा नेत्यांना सवाल

मुंबई : ‘ मी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतोय आणि बोलत राहीन. पण, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत आहात. तुमच्या पुर्वजांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला, याचे उत्तर जनतेला अपेक्षित आहे,’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यांना केला.

कालपासून भाजपावाले नवाब मलिक यांचा एक जुना व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करत आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेतील रायगडावर पक्षाचे सर्व नेते एकत्र फोटो काढण्यासाठी जवळ आले होते. धनंजय मुंडे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा केली. त्यावेळी सर्वजण जय म्हणाले, मी सुद्धा जय म्हणालो. फक्त हात वर केला नाही, याचा भाजपावाले मुद्दाम चुकीचा प्रचार करत आहेत, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

Loading...

तसेच त्यावेळीही मी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली आणि आजही देत आहे. शासनाच्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून सुरुवात केली होती, याची आवर्जून आठवण नवाब मलिक यांनी भाजपवाल्यांना करून दिली.

रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी या व्हिडिओ पोस्ट करुन नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?