fbpx

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन होत असल्यास ज्ञानेश्वर साळवेचा अभिमान – नवाब मलिक

Nanded's outcome marks BJP's overturning - Nawab Malik

मुंबई : उस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशावरुन कृती केलेली नाही मात्र राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन करत असेल तर पक्षाला त्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपाला दिली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर चढत उस्मानाबादमधील एका शेतकरी तरुणाने शेतीसंदर्भात व्यथा मांडण्यासाठी कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्याला भेट मिळू शकली नसल्याने त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर चढून आंदोलन केले. त्याच्या या कृतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बोट दाखवण्यात आले. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला आंदोलन करायला सांगितले असा आरोप करण्यात आला होता. त्यावर पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

उस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवे हा पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला पक्षाने अशी कृती करायला सांगितली नाही. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इतक्या तळमळीने आंदोलन होत असेल तर पक्षाला ज्ञानेश्वरचा अभिमान आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.