fbpx

नवबौध्द समाजाला आता अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा मिळणार

Mantralaya

मुंबई:- नवबौध्द समाजातील नागरिकांना दिलासा देणारा अतिशय महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नवबौद्ध समाजाला आता अल्पसंख्याकचा दर्जा मिळणार आहे. यापूर्वी नवबौद्धांना अल्पसंख्यांकाना मिळणाऱ्या सुविधा मिळत नव्हत्या पण आता यामध्ये  बदल करून नवबौद्ध समाजाला अल्पसंख्यांक समजामधे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे लाभ मिळण्यासाठी ‘नवबौद्ध’ ही संकल्पना वापरली जाते. मात्र अल्पसंख्यांकांना मिळणाऱ्या सुविधा यापूर्वी नवबौद्धांना मिळत नव्हत्या. आता राज्य सरकारने यादृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचचले आहे. ज्यामुळे बौद्ध नागरिकांना मिळतात त्या सर्व सुविधा नवबौद्धांना मिळणार आहेत.बौध्द समाजाप्रमाणेच सुविधा नवबौद्ध समाजाला मिळणार आहेत. यामुळे राज्यातील सुमारे 50 लाख नवबौध्द नागरिकांना हा लाभ मिळणार आहे. बौद्ध अल्पसंख्य कायदेशीर दर्जा 1956 पासून नवबौद्धांना आपोआप प्राप्त झाल्याने त्यांना अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे.