natural mineral water: शुद्ध गंगा आली रे अंगणी…

natural mineral water project bhor pune

महाराष्ट्र देशाचा विशेष रिपोर्ट

अक्षय पोकळे:- आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात माणुस नैसर्गिक पद्धतीने जीवन जगायचा जनु विसरूनच गेला आहे.  सध्या आपण क्लोरिन युक्त पाणी पिऊन आपल जगन पुढे सरकवत आहोत .  मिनरल युक्त पाणी हे फक्त बिसलेरीच देऊ शकते असा भ्रमच जनु माणसाच्या मनावर आधीराज्य करत आहे. मात्र, निसर्ग देखील मिनरल वॉटर देऊ शकतो हे अजुन आपल्याला माहितीच नाही असच म्हणाव लागेल. हे आपण का बोलत आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? मग उत्तर मिळवण्यासाठी हे वाचा

natural mineral water project bhor pune

पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग हा निसर्ग संपन्न आहे. सह्याद्रीचा घाटमाथा या जिल्ह्याला लाभला आहे. यामुळे या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे येथील झरे, नद्या, पाण्याने खळखळून वाहत असतात. नदीला जाणारे हे स्वच्छ, शुध्द पाणी भोर तालुक्यातील कारीच्या गावकऱ्यांना पुरवण्याचा वसा रायरेश्वर सामाजिक संस्थेने घेतला आहे. कारी हे गाव भोर पासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा ज्या रायरेश्वर मंदिरात घेतली तेथून जवळ असलेल्या डोंगरावरील जिंवत झऱ्यावर बांध घातले. हे अडवलेले शुध्द पाणी दोन किलोमीटर दोन इंचाच्या प्लॅस्टिक पाईपमधून गावाच्या पाण्याच्या टाकीत सोडले. त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यात शुध्द पाणी मिळाले.

natural mineral water project bhor puneपूर्वी गावापासून चार किलोमीटरवर असलेल्या निरा नदीचे गढुळ पाणी ग्रामपंचायतीच्यावतीने पुरवले जायचे. त्यामुळे गावात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत होते. परंतु आता या स्वच्छ, शुध्द पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्नही सुटले आहेत. या पाण्याची तपासणी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील लॅबमध्ये करण्यात आली. त्याचा रिपोर्टही सकारात्मक आल्याने या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे वीजे शिवाय आणि कोणत्याही यंत्रने  शिवाय हे पाणी  गावातल्या टाकित सोडले जाते यामुळे ग्रामपंचायतीचा वीज बिलाचा खर्च देखील वाचला आहे. गावाची लोकसंख्या साधारन साडेतीन हजार इतकी आहे. गावाला दिवसाला अंदाजे एक लाख लीटर पानी लागते त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातुन गावाचा पानी प्रश्न देखील सुटला आहे.  भविष्यात याच झऱ्याच्या ठिकाणी विहीर खोदण्याचा संस्थेचा मानस आहे. जेणेकरुन बारा महिने गावकऱ्यांना शुध्द पाणी मिळेल, अशा शब्दात पावसकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.या प्रकल्पाच कौतुक कराव तेवढे कमीच आहे. याच अनुकरण जर इतर वाड्या, वस्त्या आणि गावांनी केले तर सर्वानाच शुद्ध पाणी पिण्यास मिळेल. तेही अगदी कमी खर्चात.

natural mineral water project bhor puneरचना कशी आहे:-

डोंगरावर वाहता झरा आहे. तिथुन ते गावातील पाण्याची टाकी हे अंतर जवळपास २ किलोमीटर एवढे आहे. तो झरा आडवून तिथुन ते टाकीपर्यंत २ इंच ची पाईपलाइन करून ते पाणी टाकीत सोडले जाते. नंतर टाकीतुन गावातील प्रत्येक घराला ते पाणी रोज पुरवले जाते.