fbpx

‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी  पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहे’

कोल्हापूर : अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेला राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्ष पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहे असा चिमटा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला काढला आहे. भोगावती नदीवर बांधलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की,  राष्ट्रवादी हा कॉंग्रेसला केवळ सत्तेसाठी हवा असल्याची टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.तसेच हिंमत असेल तर दोन्ही काँग्रेसनी राज्यात स्वतंत्रपणे लढून भारतीय जनता पक्ष – शिवसेना युतीची सत्ता काबीज करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.