शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या उपमहापौरांविरोधात राष्ट्रवादी युवकचे ‘जोडे’ मारो आंदोलन

ncp pune

पुणे: अहमदनगर महानगरपालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहर वतीने आज महापालिकेच्या समोरील छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले यावेळेस छिंदम याच्या फोटोला काळे फासून जोडे मारण्यात आले. दरम्यान, श्रीपाद छिंदम याची भारतीय जनता पार्टि व उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

ncp

निवडणूकपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरुन शिवछत्रपतींचा आशिर्वाद घेउन सत्तेवर आलेल्या भाजपने त्यांचे महारांजाविषयी असलेले प्रेम यातुन दिसून येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेला श्रीपाद छिंदम याने महारांजाविषयी केलेल्या विकृत वक्तव्यावरुन संघाची भूमिका लक्षात येते. महाराष्ट्रात जातीय दंगली घडवणे व समाजात तेढ निर्माण करणे हेच भाजपचे व आरएसएस चे प्रमुख काम आहे या प्रकाराचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जाहीर निषेध करत आहे व श्रीपाद छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करुन त्वरीत अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे .

या वेळेस विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील , युवक शहराध्यक्ष राकेश कामठे , मनोज पाचपुते, अभिषेक बोके,फहिम शेख, महेश हांडे, निलेश वरे, विकी मोरे, अमोल ननावरे, संतोष नांगरे, नितीन राठोड, अप्पा आखाडे, विकी वाघे ,शरद दबडे, विशाल नाटेकर, मोरेश्वर चांधेरे, प्रशांत प्रभाळे, अभिषेक जाधव, संदिप काळे, गजानन लोंढे,राकेश गालफाडे निशिकांत कांबळे, सुरज लाटे, लोकेश पवार, स्वप्नील गिरमकर , प्रसाद गावडे आदि उपस्थित होते.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.