राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, एम्प्लॉयमेंट ऑफिसला ठोकणार टाळे

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र व राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रवीकांत वरपे आणि सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस येत्या गुरुवारी दि.१९ जून रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला (एम्प्लॉयमेंट ऑफिस) टाळे ठोकणार आहे.

Loading...

या टाळा ठोको आंदोलनाला अधिकाधिक युवांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराचे अध्यक्ष राकेश कामठे, जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन घोटकुले, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले आहे.

दरम्यान, वाढत्या बेरोजगारीला कमी करण्यात राज्य व केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारला रोजगार निर्माण करता आले नाहीत. यामुळे बेरोजगारी वाढली आहे, युवकांना शिक्षण घेऊनही रोजगार नाही.यामुळे पुढे अधिक भयंकर परिस्थिती निर्माण होईल. असे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याप्रसंगी निषेध व्यक्त केला.Loading…


Loading…

Loading...