इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन

pune ncp

पुणे : महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.

आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दुचाकी वाहने ढकलत नेऊन इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला. ‘देशातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रित करण्याचे काम केंद्र सरकारचे असते पण आपले केंद्र सरकार फक्त आपली सरकारे स्थापन करण्यात व्यस्त आहेत त्यांना वाढत्या महागाई विषयी काहीं देणं घेणं राहिलेले नाही’ असे मत यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे यांनी व्यक्त केले.

भाजप सरकारचे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी कडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, शहराध्यक्ष महेश हांडे, प्रदेश पदाधिकारी अभिषेक बोके, मयूर गायकवाड, वृक्ष सवर्धन समिती सदस्य मनोज पाचपुते, शहर पदाधिकारी रुपेश संत, किरण खैरे, अमोल ननावरे, अविनाश भांड, प्रमोद शिंदे, अजिंक्य पालकर, गजानन लोंढे, सागर खांदवे, राकेश मारणे, प्रशांत प्रभाळे, आकाश पाटणकर, शरद दबडे, अच्युत लांडगे, स्वप्नील थोरवे,सिधू बनकर, उमेश कोंढाळकर, विकी वाघे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी टॅक्समध्ये घट करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सल्ला दिला आहे. आर बी आय च्या मॉनिटरी पॉलिसीच्या मिनट्समध्ये शक्तीकांता दास यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला इनडायरेक्ट टॅक्समध्ये कपात करण्यासाठी आवाहन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या