fbpx

बेरोजगारीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : वाढत्या बेरोजगारीला कमी करण्यात राज्य व केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारला रोजगार निर्माण करता आले नाहीत. यामुळे बेरोजगारी वाढली आहे, युवकांना शिक्षण घेऊनही रोजगार नाही.यामुळे पुढे अधिक भयंकर परिस्थिती निर्माण होईल. असे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याप्रसंगी निषेध व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे उपस्थित होते. दरम्यान, विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस सभागृहात आणि सभागृहाबाहेर चांगलीच आक्रमक झाली आह्रे. त्यातच राष्टवादी युवक कॉंग्रेसच्या नवीन नियुक्त्या झाल्यापासून संघटनेने कात टाकली असून त्यांच्या आंदोलनात चांगलीच आक्रमकता दिसून येत आहे.