वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख , कार्य़ाध्यक्ष सुरज चव्हाण आणि रविकांत वर्पे यांच्या पुढाकाराने आंदोलन छेडण्यात आले.

Loading...

काल नागपूर येथील संविधान चौक ते कलेक्टर कार्यालयापर्यंत युवा कार्यकर्त्यांनी बेरोजगारीविरोधात एल्गार करत भीक मांगो आंदोलन केले. सरकारच्या नियोजनशून्य व निष्क्रिय धोरणामुळे अनेक युवक बेरोजगार आहेत. युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, असे आश्वासन या सरकारने दिले होते. परंतू अजूनही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे या सरकारला रा.यु.काँने धारेवर धरले आहे.Loading…


Loading…

Loading...