राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली ‘सामना’ वृत्तपत्राची होळी

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सामना वृत्तपत्रामधून अजित पवारांना छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असंच म्हणावं लागेल, अशी जहरी टीका केली होती. याचाच निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने ‘सामना’ वृत्तपत्राची होळी करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष राकेश कामठे अमोल ननावरे संतोष डोख संतोष नांगरे किशोर कांबळे फहिम शेख महेश हांडे स्वप्नील खडके निखिल बटवाल प्रशांत प्रभाळे विकी वाघे विकी मोरे अमोल पालके ऋषीकेश भुजबळ तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाले होते अजित पवार

शिवसेनेची वृत्ती गांढुळासारखी आहे. या लोकांना खड्यासारखं बाजूला करायला हवं. तसेच नेसरी भागात हत्ती, रानडुक्कर यामुळे जनता त्रस्त आहे. मात्र हे सरकार उंदिरांसोबत खेळण्यात मग्न आहे. आपण प्रश्न लावून धरू. पुढच्या वेळी यांना निवडून देऊ नका. अशी टीका अजित पवार यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान नेसरी येथील सभेत केली होती.

सामनामध्ये काय करण्यात आली होती टीका

शरद पवारांनी जे कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीतच गमावले. त्यामुळेच ७५ व्या वर्षातसुद्धा पक्षबांधणीसाठी पवारांना वणवण करावी लागत असल्याची टीका, सामनातून अजित पवार यांच्यावर करण्यात आली आहे. आम्हाला गांडूळ म्हणणाऱ्यांना दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. म्हणून तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असंच म्हणावं लागेल, अशी विखारी टीका सुद्धा अजित पवार यांच्यावर सामना मधून करण्यात आली आहे.

2 Comments

Click here to post a comment