राष्ट्रवादी देणार तृतीयपंथीयांना तिकीट ; सुप्रिया सुळेंचा प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील तृतीयपंथीय नागरिकांना मुख्य प्रवाहात सामाविष्ट करण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. येत्या निवडणुकांमध्ये पक्षातर्फे तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यासाठी आपण आग्रही आहोत, असे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पुण्यात झालेल्या एका साहित्यिक संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना सुळे यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सत्ताधारी पक्ष फारसा अनुकूल नसताना लोकसभेत आम्ही समलिंगी संबंधांना आणि सरोगसी विषयक विधेयकाला संमती मिळवली. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून कार्य करत असतो. समाजातील वंचित घटकांचे सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यामुळेच समाजातील या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही पाऊल पुढे उचलणार असून आगामी निवडणुकीत एका तरी तृतीयपंथीला तिकीट दिले जाईल, असा आग्रह प्रदेशाध्यक्षांकडे धरणार आहे.’