इंदापूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार ! अजित पवारानंतर धनंजय मुंडेंच वक्तव्य

उस्मानाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यात शेतकरी मेळाव्यात बोलतांना “आघाडी झाली नाही तरी चालेल पण इंदापुरची जागा सोडणार नाही ” असे वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. कारण इंदापूरमधून कॉंग्रेसपक्षाकडून हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आमदार भरणे मामा यांचा आग्रह आहे. त्यामुळे इंदापूर मतदार संघात नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इंदापूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

bagdure

दरम्यान, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आघाडी बाबत म्हणाले, मागच्या विधानसभा निवडणुकीला कॉंग्रेस- राष्ट्रवादी वेगवेगळी लढली आणि भाजप-शिवसेना पण वेगवेगळी लढली. त्यामुळे विधानसभेचा जो निकाल बाहेर आला. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता मामा भरणे निवडून आले. त्यामुळे आघाडी ची जेव्हा चर्चा होईल तेव्हा तेव्हा स्थानिक जो आमदार ज्या पक्षाचा आहे. त्याला उमेदवारी द्यावीच लागेल. त्यामुळे अजित पवार यांनी इंदापूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार असे स्पष्ट केले आहे.

You might also like
Comments
Loading...