fbpx

‘एक वर्ष अंधकराचे’ राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला भाजपच्या सत्तेतील वर्षपुर्तीचा निषेध

पुणे : पुणे महानगरपालिकेत भाजपला सत्तेत येऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षात सभागृहात विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्या कायमच खटके उडत आलेत. आज भाजप महापालिकेतील सत्तेची वर्षपूर्ती साजरी करत असताना पुण्याचा सर्वांगीण विकास केल्याचा दावा करत आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजप

सत्तेविरोधात ‘एक वर्ष अंधकराचे’ मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांचा निषध केला आहे.
सत्ताधारी भाजप विरोधात लाल महाल ते महापालिका दरम्यान काढलेल्या ‘एक वर्ष अंधकराचे’ या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते काळे कपडे आणि काळा फेटा घालून सभागी झाले होते.

या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अंकुश काकडे, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांच्यासह सर्व माजी महापौर , पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्ते मोठा संख्येने उपस्थित

यावेळी बोलताना पुणे महापालिकेचे विरोधीपक्ष नेते चेतन तुपे म्हणाले की, केंद्रात, राज्यात आणि महापालिकेचे भाजपचे सरकार असताना शहराचा विकास करण्यास भाजपला अपयश आले आहे. वर्ष झाले तर नागरिकांच्या नाही तर बिल्डरधार्जिणे निर्णय घेण्यात आले.त्यामुळे पुणेकरांचे सर्व वर्ष अंधारात गेले आहे.त्यासाठी आम्ही हा अंधकार मोर्चा काढला आहे.