शालिनी विखेंच्या भूमिकेने नगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस संभ्रमात

टीम महाराष्ट्र देशा : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी भाजपचा ‘जय श्रीराम’ नाकारत आपण अजून कॉंग्रेसमधेच असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधान आले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचे चिरंजीव डॉ़ सुजय यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या विरोधात लढविली़ निवडणुकीनंतर मी काँग्रेसमध्येच, अशी भूमिका अध्यक्षा शालिनी विखे यांनी सभागृहात जाहीर केल्याने राष्ट्रवादी संभ्रमात पडली आहे़ जिल्हा परिषदेत आगामी काळात काय भूमिका घ्यावी, असा पेच राष्ट्रवादीसमोर आहे़.

Loading...

अहमदनगर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत़ जिल्हा परिषदेत भाजप विरोधात होती़ परंतु, लोकसभा निवडणुकीत चिरंजीव डॉ़ सुजय विखे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला़ निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची पहिली सभा शुक्रवारी झाली़ या सभेत विखे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे हे सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले़

ध्वनीक्षेपक हाती घेत त्यांनी अध्यक्षा विखे यांना ‘जय श्रीराम’ केला़ त्यावर विखे यांनी मी अजून काँग्रेसमध्येच आहे, अशी प्रतिक्रिया दिली़ शालिनी विखे यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणेही सभागृहात उपस्थित होते़ त्यांनी लगेच कृपया सभागृहात कुणीही राजकारण आणू नये, असे म्हणत सावरासावर केली़ लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत विखे व वाकचौरे यांच्यात टोकाचा संघर्ष झाला़ पण लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली़ आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले