राष्ट्रवादी आक्रमक! सक्षणा सलगर यांच्याकडून दरेकरांना वंगण फासण्याचा इशारा

उस्मानाबाद : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टिप्पणी केली होती. दरेकर यांनी पुण्यात शिरूर येथील कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरिबांकडे पाहाण्यासाठी वेळ नाही. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष’ आहे’. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून संताप व्यक्त होत आहे.

उस्मानाबादेत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी प्रवीण दरेकरांना इशारा दिला आहे. दरेकर यांनी २४ तासांत माफी मागावी. अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे वंगण फासणार असल्याचा इशारा सलगर यांनी दिलाय. माफी मागा अथवा नाही तर परिणामाला सामोरे जा, असे आव्हानही सलगर यांनी दिले आहे. भाजप हा महिलांच्या बाबतीत हीन मनोवृत्ती दर्शवणारा पक्ष, दरेकर यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे. फडणवीसजी, तुमच्या वाचाळवीरांना आवरा. राम कदम, परिचारक आणि आता दरेकर यांना आवरा असा टोला सक्षणा सलगर यांनी लगावला आहे.

दुसरीकडे महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी दीक्षाभूमी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी दरेकर यांच्या फोटोला चपलांचा हार घालत निषेध नोंदविण्यात आला. पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं दरेकरांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. बालगंधर्व चौकात हे राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी दरेकरांविरोधात घोषणाबाजी केली.

महत्त्वाच्या बातम्या