भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..!

पुणे – नागपूर इथे सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनात स्त्री शिक्षणाला जन्म देणारा भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. महापालिकेशी समन्वय साधून सर्व अडचणींवर मात करून उत्तम स्मारक उभारण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला आहे. स्मारकासाठी पुणे महानगरपालिकेला सरकार सर्वोतोपरी मदत करणार असून निधीची अजिबात कमतरता पडू देणार नाही, असे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

गेले कित्येक वर्षे अखेरची घटका मोजत असलेला हा वाडा मुलींच्या शिक्षणाचे जन्मस्थळ म्हणून परिचित आहे. परंतु अनास्थेपोटी किंवा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा वाडा पूर्णतः दुर्लक्षित होता. अनेक संघटना वाड्याचे स्मारक व्हावे म्हणून प्रयत्नशील होते. ठाण्यातील एक्का फाऊंडेशन संस्था त्यांच्या इडियट ट्रेकर्सच्या ग्रुपच्या माध्यमातून गेले अनेक दिवस या प्रश्नावर आवाज उठवत होती. त्यांनी युटूब च्या माध्यमातून बनवलेला व्हिडिओ देखील सोशल मीडियातून कमालीचा व्हायरल झाला होता.

राज्य सरकारने हा अतिशय चांगला निर्णय घेतला असून, महापालिकेकडून मुबलक निधी उपलब्ध करून दिला जाईल. फुले दाम्पत्य समाजासाठी कायमच आदर्शवत असल्याने या स्मारकातून नक्कीच प्रेरणा मिळेल.
मुक्ता टिळक (महापौर)

मुख्यमंत्री कार्यालयाशी विविध स्मारकांबाबत एक्का फौंडेशन कायमच पत्रव्यवहार करत असून पुरातत्व खात्याशी देखील संपर्कात आहे, महाराणी सईबाई समाधी, किल्ले शिवनेरीवरील पुरातत्व खात्याचा माहिती देणाऱ्या फलकांबाबतचा गलथान कारभार, अखेरच्या घटका मोजणारा किल्ले पदमदुर्ग संवर्धन आदी बाबतीत आमचा संघर्ष सुरू आहे.
-प्राजक्त झावरे-पाटील
अध्यक्ष, एक्का फाऊंडेशन.

आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाची दुरावस्था…

राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे होणार राजकारणात सक्रिय?