फ्लोराईड मिश्रण पाणी प्रकरणात राज्यातील १२ जिल्हाधिकाऱ्यांना अटक करा: हरित लवाद

फ्लोराईद मिक्स पाण्यामुळे होणाऱ्या आजाराला जिल्हाधिकारीच जबाबदार; हरित लवादने ओढले ताशेरे

पुणे: फ्लोराईड मिक्स पाण्यामुळे होणाऱ्या आजाराला जिल्हाधिकारीच जबाबदार आहे. त्यामुळे १२ जिल्यांच्या जिल्हाधिकारी आणि त्या संबंधीतील अधिकाऱ्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादने दिले आहे. फ्लोलाईड मिश्रीत पाणी पुरवठ्यावर वेळीच पायबंद घालण्यासाठी हरित लवादने सूचना करूनही संबंधीत जिल्हा प्रशासनाने हे आदेश गांभिर्याने न घेतल्याने राष्ट्रीय हरित लवादने हे आदेश काढलेत.

नांदेड, चंद्रपूर, परभरणी, यवतमाळ, हिंगोली, वाशीम, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, भंडारा या १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना अटक करून हजर करा, तो आदेश आहे. १० हजार रूपयांचा जामीनपात्र वॉरंटनुसार हे आदेश काढण्यात आलेत. हरित न्यायाधिकरणाच्या पुणे बेंचने हे आदेश काढलेत. संदर्भातल्या अधिकार्यांना अटक करण्याचे सक्त आदेश हरित लवादने दिले आहेत.

या बाराही जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठीच्या बोअरवेलचे प्रमाण जास्त आहे. दोन बोअरवेलमधील अंतर आणि खोली यासंदर्भात नियमावली आहे. मात्र त्यांचे पालन होत नसल्याची तक्रार करत अॅड. असीम सरोदे यांनी 2013 साली हरित लवादकडे याचिका दाखल केली होती.

या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आहेत जबाबदार

नांदेड

चंद्रपूर

परभरणी

यवतमाळ

हिंगोली

वाशिम

जळगाव

जालना

लातूर

नागपूर

भंडारा

बीड

You might also like
Comments
Loading...