fbpx

राष्ट्रध्वज सांभाळता येत नाही देश काय सांभाळणार – काँग्रेस

amit shaha

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात आज गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत ७२ वा स्वातंत्र्यदिनउत्साहात साजरा होत असतानाच दिल्लीतील लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर भाजपच्या मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या मुख्यालयातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तिरंगा फडकावत असताना तो निसटला आणि जमिनीवर पडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यांना राष्ट्रध्वज सांभाळता येत नाही देश काय सांभाळणार अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, झेंडा फडकवण्यासाठी शहांनी स्तंभाला बांधण्यात आलेली दोरी खेचताच तिरंगा थेट त्यांच्या पायाजवळ पडला. त्यानंतर काँग्रेसने लगेच या घटनेचा व्हिडीओ सोशल साईटवर पोस्ट केला व त्याखाली ‘ज्यांच्याकडून देशाचा झेंडा सांभाळला जात नाही ते देश काय सांभाळणार?’, अशी टीकाही केली.

‘तसेच ५० वर्षांपासून तिरंग्याचा तिरस्कार केला नसता तर त्यांचा आज असा अपमान झाला नसता. दुसऱ्यांना देशभक्तीचे प्रशस्तीपत्रक देणाऱ्यांना राष्ट्रगीताचा मानही ठेवता येत नाही’, अशी सणसणीत टीका काँग्रेसने या ट्वीटमध्ये केली आहे.

जो पक्ष आपल्या मित्र पक्षांना सांभाळू शकत नाही, तो जनतेला काय सांभाळणार? : हर्षवर्धन पाटील