राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; श्रीनिवास पोफळे ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार

blank

टीम महाराष्ट्र देशा– सहासष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. नाळ या चित्रपटातला बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जाहीर झाला असून, नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कारही नाळ चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांना जाहीर झाला. मराठी चित्रपटांमधून भोंगा हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला असून, तर अंधाधुन हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे.

हेलारो या गुजराथी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. अभिनेते आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला तर तेलगू अभिनेत्री कीर्ती सुरेश हिनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. उरी या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, तर पद्मावत चित्रपटानं संगीत आणि नृत्य दिग्दर्शनाचे पुरस्कार पटकावले.

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार बिंदू मनी यांना, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार अरिजीत सिंह यांना तर स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला. किरकिरे यांना चुंबक या मराठी चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कारही जाहीर झाला असून, बधाई हो चित्रपटातल्या भूमिकेसाठी सुरेखा सिकरी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

ना शिंदे, ना चव्हाण महाराष्ट्रातला ‘हा’ नेता होणार कॉंग्रेसचा अध्यक्ष

 

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

 

सांगलीत जगभरातून मदत येतेय, पण परमपूज्य भिडे गुरुजी कुठे आहेत? – आव्हाड