राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ शुक्रवारऐवजी शनिवारी प्रदर्शित होणार चित्रपट

मुंबई : अमर देवकर दिग्दर्शित म्होरक्या चित्रपटाने 2018 मध्ये मराठी चित्रपटांचं प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. दिग्दर्शक अमर देवकर यांच्यासह ग्रामीण भागातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत.

तसेच हा चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला. आणि त्यांनी अंतिम तारीख तारीख ७ फेब्रुवारी ठरली. याच दिवशी मेकअप, मलंग, शिकारा आदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण या शर्यतीत ‘म्होरक्या’ मागे पडला आहे. काही निर्माण झालेल्या अडचणी योग्य वेळात सोडवता न आल्याने शुक्रवारी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता शनिवारी प्रदर्शित होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक देवकर यांनी फेसबुकवरून आपल्या चित्रपटाला शुक्रवारी एकही शो मिळत नसल्याची माहीती दिली. तसेच या फेसबुक पोस्टमध्ये देवकर म्हणतात, ‘व्यवस्थे’ला दोषी धरलं आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘आमचा चित्रपट ऐसपैस यांनी प्रस्तुत करायचं ठरवलं. त्यानुसार सिनेमाची डीसीपी आवश्यक प्रोजेक्टर कंपन्यांकडे दोन ते तीन दिवस आधी पोचणं आवश्यक होतं,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, ‘ती डीसीपी मिळाल्यानंतर तो सिनेमा अपलोड करता येतो. पण आता प्रस्तुतकर्त्यांनी ही डीसीपी योग्य वेळेत पोचवली नाही. त्यामुळे सिेनेमा अपलोड झाला नाही. आता शुक्रवारी हा सिनेमा अपलोड होईल आणि शनिवारी दिसेल. केवळ नियोजनातल्या हलगर्जीपणामुळे सिनेमाला हा फटका बसला असून ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे,’ अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.