सरकार नाराज कलाकारांच्या घरी स्पीड पोस्टने पाठवणार पुरस्कार

नवी दिल्ली – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते मिळणार असल्याचे कळल्यानंतर  70 हून अधिक कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. या कलाकारांचे पुरस्कार व प्रमाणपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पीड पोस्ट सुविधेची मदत घेण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

70 हून अधिक कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घातला. या पार्श्वभूमीवर विजेत्यांचे पुरस्कार त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवावेत?, यावर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विचारविनिमय केल्यानंतर केंद्र सरकारनं ठरवले की दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पीड पोस्ट सुविधेच्या मदतीनं राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

You might also like
Comments
Loading...