‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर यावेळी ‘महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केलं जात नाही, एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिला जातो. त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जायला हवं. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी स्थिती आहे. कुठेही 3 ते 4 दिवसांचा साठा नेहमी असतोच. त्यापुढे तो येतच असतो. जेवढं तुम्ही लसीकरण करता, त्यापेक्षा जास्त डोस केंद्र सरकार देत असतं.’, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले होते.

जावडेकर यांना उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, ‘लसीकरण आवरून महाराष्ट्र शासन राजकारण करत नाही याउलट लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी आहे ते आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवत आहे आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षा ही कमी आहे.’ असे त्यांनी यावेळी ट्विट करत सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या :