राष्ट्रगीत अवमानाचा ठपका आता नगराध्यक्षांवर ठेवण्याच्या हालचाली

सातारा : गेल्या 2 नोव्हेंबर रोजी सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या गोंधळातच राष्ट्रगीत सुरु झाले. यावेळी माईक बंद ठेवण्याची नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केलेली सूचना त्यांना भोवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रगीत अवमान प्रकरणी सत्ताधारी व विरोधक यांनी परस्परावर गुन्हे दाखल केलेले असताना अवमानाचा ठपका आता नगराध्यक्षांवर ठेवण्याच्या हालचाली आहेत. भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी माधवी कदम यांच्या विरोधात राष्ट्रगीत अवमान प्रकरणी न्यायालयात खाजगी खटला दाखल करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यामुळे सातारा विकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

दि.2 नोव्हेंबर रोजी सातारा पालिकेच्या सभागृहात शहरातील घंटागाडयांचे टेंडर ठाण्याच्या कंपनीला देण्याचा विषय मांडला जाणार होता. त्यावेळी नविआचे नगरसेवक शेखर मोरे व भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी ऐनवेळी वेगळे विषय मांडण्याचे प्रयत्न करताच नगराध्यक्ष माधवी कदम यांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी आरोग्य सभापती वसंत लेवे व विरोधी पक्षनेते अशोक मोने यांच्यात धक्काबुक्की झाली. साविआच्या सदस्यांनी विषयांना एकदम मंजूरी देउन सभा गुंडाळली. यावेळी नगराध्यक्षांनी माईक बंद करण्याच्या सूचना माईक ऑपरेटरला दिल्या आणि नगरसेवकांचा गोंधळ सुरू असताना अचानक राष्ट्रगीत सुरू झाले. या संपूर्ण घटनेवर आता कायदेशीर भाष्य होणार असून राष्ट्रगीताचा अवमान खुद्द नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केल्याची भावना भाजपची झाली आहे.

Loading...

कदम यांच्यावर येत्या दोन दिवसात न्यायालयात खाजगी खटला येत्या दोन दिवसात दाखल केला जाणार आहे. या माहितीला नगरसेवक सिद्दी पवार यांनी दुजोरा दिला. संकेताप्रमाणे सभा संपल्यानंतर राष्ट्रगीतासाठी नगराध्यक्षांसह सर्व सदस्य उभे राहतात. मात्र सर्व साधारण सभेत गोंधळ झाल्याने अचानक राष्ट्रगीत सुरू झाल्याचे कोणाचे लक्षात आले नाही. सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष या नात्याने नगराध्यक्षांनी गोंधळ थांबवून राष्ट्रगीत शिष्टाचार सर्वांनी पाळावा. याची स्पष्ट कल्पना देणे आवश्यक होते. त्यामुळे राष्ट्रगीत अवमान प्रकरणात सर्वप्रथम नगराध्यक्षा दोषी असल्याची भूमिका सिध्दी पवार यांनी मांडत त्यांच्या विरोधात खाजगी खटला न्यायालयात दाखल करणार असल्याचे प्रतिक्रिया देताना सांगितले.

राष्ट्रहित अवमान अधिनियम 1971 च्या 69 कलमानुसार राष्ट्रगीत अवमान प्रकरणी गुन्हा सिध्द झाल्यास कमीत कमी तीन वर्षाची शिक्षा आणि आर्थिक दंड सुनावला जाऊ शकतो. खाजगी खटल्याच्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊनच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार आहेत.राष्ट्रगीत अवमान प्रकरणात एकूण पाच जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. आता थेट नगराध्यक्षांना कायदेशीर पातळीवर घेरण्याची तयारी सुरू झाल्यानंतर शहर पोलिसांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!