नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील : साध्वी प्रज्ञासिंह

टीम महाराष्ट्र देशा : स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे आहे, असे वक्तव्य करत अभिनेता कमल हसनने खळबळ उडवली आहे. हसन यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांचे समर्थन केले आहे, तर अनेकांनी टीका देखील केली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत आलेल्या भाजपच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी कमल हसन यांना उत्तर दिल आहे, नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील. त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करावे, अशा लोकांना लोकसभा निवडणुकीत उत्तर मिळेल. असं साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हंटले आहे. दरम्यान, प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणल्याने आणखीन वाद निर्माण होणार असल्याचं दिसत आहे.

Loading...

कमल हसन यांची जीभच कापली पाहिजे

कमल हसन यांनी हिंदू दहशतवादाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. तमिळनाडूतील सध्याचे मंत्री के. टी. राजेंथ्र बालाजी यांनी कमल हासन यांची जीभच कापली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. बालाजी हे अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते आहेत. हिंसाचाराला खतपाणी घालेल, असे वक्तव्य कमल हासन यांनी केले आहे. केवळ मागासवर्गीयांची मते मिळवण्यासाठी कमल हासन यांच्याकडून असे वक्तव्य करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

कमल हसन यांना म्हातारचळ

अभिनेत्री पायल रोहतगीने व्हिडिओमार्फत कमल हसन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे . ‘त्यांना म्हातारचळ लागलं आहे.’ अशी सणसणीत चपराक पायल रोहतगीने हसन यांना लगावली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश