ग्वाल्हेर: हिंदू महासभा आणि त्यांचे नेते हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. तर नथुराम गोडसे यांच्या संदर्भातील देखील या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य काही नवी नाहीत असाच एक वाद आता पुन्हा निर्माण झाला आहे.
यावेळी हिंदू महासभेने ग्वाल्हेरच्या दौलतगंज येथील कार्यालयात गोडसे अभ्यास केंद्र सुरु केले आहे. यावेळी गोडसे सहित वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई आणि संघाच्या संबंधित पदाधिकार्यांच्या प्रतिमांचे पूजन कारण्यात आले. यावेळी महासभेच्या नेते जयवीर भारद्वाज यांनी नेहरू आणि जिन्ना यांचा उल्लेख करत गोडसेला योग्य असल्याचे सांगितले. या अभ्यास केंद्रात नथूराम गोडसेंच्या जीवनातील घटनांचा अभ्यास केला जाणार आहे.
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेवर हिंदू महासभेच्या स्टडी सेंटर उघडल्यानंतर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटल कि, ‘ मला आनंद होत आहे की, ७० वर्षांनंतर बदलेल्या वैचारिक वातावारणात गोडसे सारख्या दोषींची बाजू मांडण्यासाठी कार्य केले जात आहे. नथुराम गोडसेला आनंद झाला असेल.’ अशी टीका तुषार गांधी यांनी केली आहे.
त्याचबरोबर कॉंग्रेस कडून देखील शिवराज सरकार टीका करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटलं की, खुलेआम नथुराम गोडसे अभ्यास केंद्र सुरु केल जात असेल तर मुख्यमंत्री आणि भाजपने हे स्पष्ट कराव कि, ते कोणत्या विचारसरणी सोबत आह्रेत. गांधीजींच्या कि, गोडसेच्या’
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपाच्या मनमानी कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे’
- काही नेत्यांना सेक्युरिटीची हौस; अब्दुल सत्तारांचा भाजप नेत्यांना टोला
- ट्रोलिंगनंतरही रिकी पॉण्टिंगचा आखडूपणा काही कमी होईना, म्हणाला…
- बर्ड फ्लूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
- औरंगाबाद मनपाचा ढिसाळ कारभार, ‘या’ रुग्णालयांना नोटीसही नाही