नथुराम गोडसे दहशतवादीचं, पण संपूर्ण हिंदू धर्माला दोष देणे चुकीचे – आंबेडकर

prakash-ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे दहशतवादी होता, मात्र गोडसेवरून संपूर्ण हिंदू धर्माला दोष देणे चुकीचे आहे, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

दाक्षिणात्य अभिनेते आणि नेते यांनी कमल हसन यांनी भारतातीलं पहिला दहशतवादी हिंदू होता, त्याच नाव नथुराम गोडसे असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. हसन यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याबदल आंबेडकर यांना विचारल असता एखाद्या व्यक्तीची हत्या करणे दहशतवादी कृत्य आहे. मात्र त्यामुळे संपूर्ण हिंदू धर्मालाच दोषी धरणे चुकीचे आहे. असं ते म्हणाले.

नथुराम गोडसे प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहची माफी

कमल हसनने यांना प्रत्युत्तर म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील. त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करावे, अशा लोकांना लोकसभा निवडणुकीत उत्तर मिळेल असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हंटले होते.

दरम्यान, भाजप नेत्यांनी फ्त्कारल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे