पैठण- भाविकांच्या गर्दीने पैठण फुलले

पैठण : नाथष्ठीसोहळ्यासाठी पैठणकर व महाराष्ट्रातून दाखल झालेल्या भाविकांच्या गर्दीने पैठण फुलन गेले आहे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी फाल्गून कूष्ण षष्ठीला पैठण येथे यात्रा सोहळा होतो. या सोहळ्याला साडेचारशेवर्षाची मोठी परंपरा आहे.


महाराष्ट्रातून यंदा ही २५० दिंड्या दाखल झाल्या आहेत. नऊ मार्च ला समाप्ती सोहळ्यातील काल्याचा प्रसाद घेऊन या दिंड्या आणि वारकरी नाथनगरीचा निरोप घेतील. येथे भाविकांच्या सोयी साठी कचरा टाकण्यासाठी वाहने, फिरती स्वच्छताघरे आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


आरोग्य विभागामार्फत व अन्य सेवाभावी संस्था मार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोठेही गैरप्रकार घडू नये म्हणुन ठिकठिकानी पोलीस मदत कक्ष उभारले असून भाविकांसाठी स्वच्छ पेयजल तसेच नाथमंदिर संस्थानमार्फत अल्पदरात भोजन व फराळाची सोय केली आहे. भाविकांसाठी तीन दिवसांचा हा षष्ठी सोहळा एक मोठा सनच आसतो. यात्रेच्या गर्दीमुळे व भानुदास एकनाथ च्या गजराने पैठणनगरी दुमदुमली आहे.