परळीत महिला भवन उभारणार; महिला बचत गटांना नाथ प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करणार – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : परळी शहरात महिला बचत गटाच्या माध्यमातुन महिला भगीनींचे सक्षमीकरण करण्यासाठी यापुढे नाथ प्रतिष्ठान सक्रिय सहभाग घेणार असून नगर परिषदेच्या वतीने शहरात महिला भवन उभारण्याची घोषणा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

Loading...

नगर परिषदेच्या वतीने परळी शहरातील २२ महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार याप्रमाणे २ लाख २० हजार ३ वस्तीस्तर संस्थांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचा फिरता निधी आज कै.लोकनेते गोपिनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

महिला बचत गटांना कर्जासाठी व इतर बाबींसाठी येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी यापुढे आपले नाथ प्रतिष्ठान सक्रिय कार्य करणार आहे. याशिवाय चांगले काम करणार्‍या महिला बचत गटांना आर्थिक सहकार्य करण्याची घोषणाही त्यांनी केली. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी दुकाने उपलब्ध करून देण्याचीही घोषणा त्यांनी केली.Loading…


Loading…

Loading...