नसीरुद्दीन शाहसह इतर ६०० कलाकार भाजपाविरोधात मतदानासाठी करताहेत आवाहन

टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकारवर विरोधीपक्षांकडून सतत टीकाकरण सुरु असते. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यावर अन्य राजकीय पक्षांनी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता तर सिनेक्षेत्रातील कलाकारांनीही भाजप विरोधात आता एल्गार केला आहे. त्यांनी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे.

भाजपाला पुन्हा सत्ता मिळविण्यापासून रोखण्यासाठी अभिनेता नसीरुद्दीन शाहने पुन्हा एकदा गोंधळा उडवला आहे. नसीरुद्दीन शाह आणि इतर थिएटर कलाकारांनी भाजप आणि त्यांच्या सहयोगींच्या विरोधात मतदानाचे अपील केले आहे. नसीरुद्दीन शाहंंच्या व्यतिरिक्त अपील करणाऱ्यामध्ये  अमोल पालेकर, अनुराग कश्यप, डॉली ठाकोर, लिलीट दुबे, कोंकंंना सेन शर्मा, रत्ना पाठक शाह, मानव कौल आणि चंदन रॉय सान्याल यांचा देखील समावेश आहे

12 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, तमिळ, बंगाली, मराठी, मल्याळम, कन्नड, आसामी, तेलगू, पंजाबी, कोकणी व उर्दू) हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून आर्टिस्ट यूनाइट इंडिया या वेबसाईट वर टाकण्यात आले आहे.यापूर्वी देखील देशातील १०० हून अधिक फिल्ममेकर्सनी भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आले. आणि त्यांनी हे आवाहन केले होते. या संदर्भात त्यांनी एक निवेदनदेखील जारी करण्यात आले होते.

भाजप सरकारने गेल्या चार वर्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळपेची केली आहे. असा आरोप या सर्व फिल्म मेकर्सनी केला आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, समाजात मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ वाढवणे, सेन्सॉरशिपच्या नावाखाली उगाच होणारी गळपेची अशा अनेक मुद्यांवरून तसेच देशात उगाच युद्धाचं वातावरण तयार करणं, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक संस्था नेस्तनाबूत करणे, देशात विज्ञानविरोधी वातावरण तयार करणे, ज्या व्यक्तींचा कला, संस्कृती आणि विज्ञानाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना महत्त्वाच्या पदावर बसवणे अशी या विरोधाची महत्वाची कारणं आहेत.