नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार ?

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या आरक्षणाची सोडत काल मुंबईत गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. पुण्यासह जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर या परिषदांचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालं आहे.

रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला आणि भंडारा जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती परिषदांचं अध्यक्षपद सर्वसाधारण मागास प्रवर्गासाठी तर ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

सोलापूर, जालना अनुसूचित जाती सर्वसाधारण गटासाठी, नागपूर, उस्मानाबाद अनुसूचित जाती महिलांसाठी, नंदुरबार, हिंगोली अनुसूचित जमाती सर्वसाधारण गटासाठी तर पालघर, रायगड, नांदेड अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी आरक्षित झालं आहे.

नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आगामी अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या असून, त्यातल्या त्यात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या शिवसेनेत इच्छुकांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. राज्यात संभाव्य महाशिव आघाडीचा सुरू असलेल्या प्रयोगाचा विचार करता, सेनेकडून बाळासाहेब क्षीरसागर, सुरेखा दराडे यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर असली तरी, विद्यमान अध्यक्षदेखील या पदावर पुन्हा दावा करू शकतात.

याशिवाय भास्कर गावित याआदिवासी सदस्याच्या नावाची देखील चर्चा आहे. तसेच विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे यांना पक्षश्रेष्ठींनी ठरविले तर पुन्हा संधी मिळण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. शिवसेनेला एकट्याच्या बळावर अध्यक्षपद मिळणे अशक्य असल्यामुळे महाशिव आघाडीचा प्रयोग झाल्यास विषय समित्यांच्या सभापतिपदासाठीही सेनेच्या इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या