fbpx

नाशिक जि.प.चा कारभार स्विकारताच सीईओ पंधरा दिवसाच्या रजेवर

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेचा नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंगळवारी पदभार स्विकारल्यानंतर लगेचच अचानक पंधरा दिवसांच्या रजेवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वादग्रस्त ठरलेले मुख्य कार्यकारी आधिकारी यांची सोमवारी तडकाफडकी बदली केल्यानंतर डॉ. नरेश गिते यांनी नाशिक जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी आधिकारीचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांची भेट घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचा ३२ वर्षांचा अनुभव असून विभागाचे कामकाज हाताळले आहे.असे सुतोवाच डॉ. गिते यांनी पत्रकारांशी बोलतांना केले होते.

तसेच प्रशासन व सदस्यांमध्ये समन्वय साधत सर्वांना सोबत घेत काम करण्याचा प्रयत्न करेन, असे डॉ. गिते यांनी असेही सांगितले होते.मात्र, आज अचानक कोणतेही कारण स्पष्ट न करता पंधरा दिवसांच्या प्रदीर्घ रजेवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन महिन्यापासून ज्या कारणाने वादग्रस्त ठरलेले मीना यांची उचलबांगडी झाली. लोकप्रतिनिधी व आधिकारी यांच्या समन्वयातून यापुढील कामे सकारात्मक रित्या होतील असे वाटत असतानाच गिते यांच्या प्रदिर्घ रजेने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.येत्या मार्च अर्थसंकल्पा पर्यंत उर्वरित निधी खर्च करण्याचे उद्दिष्ट असताना आता नवनिर्वाचित सीईओ २२ तारखेपर्यंत रजेवर असल्याने जिल्हा परिषदेची कामांना पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे.