नाशिक : पूर पाहायला येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, नांगरे पाटील अॅक्शन मोड मध्ये

टीम महाराष्ट्र देशा : नाशिक शहरासह संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. गोदावरी खोऱ्यातील सर्वच धरणांतून मोठ्या प्रमाणत विसर्ग होत आहे. पर्यटनस्थळांवर प्रसंगावधान राखत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितिच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलिसांनी मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पूरपरिस्थितीत प्रशासनास विरोध करणाऱ्या तसेच आदेशाचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

या आदेशानुसार ब्रिजवर, नदी किनारी, धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे, पुरात पोहणे, पुर पाहण्यासाठी गर्दी करणे तसेच ज्या ठिकाणी प्रशासनाची मदत पोहचण्यास अडथळा होईल अशी कृती करणे, हुल्हड़बाजी करणे, धोकादायक वाडे, ठिकाणे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी प्रशासनकडून हलाविताना प्रशासनास विरोध करणे अशा गोष्टी केल्या तर नाशिक पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या कृत्यांमुळे जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते. म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात CRPC 144 चे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

या आदेशाचा भंग केला तर IPC 188 प्रमाणे गुन्हे दाखल करून करवाई करण्यात येणार आहे. याबाबत सर्वानी नोंद घ्यावे असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच ही माहिती आपले मित्र नातेवाईक यांना देऊन सध्याच्या पुर परिस्थितिमुळे जीवीत अथवा वित्त हानी होणार नाही या कामी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे

महत्वाच्या बातम्या 

बाजारबुणग्यांचे ठरायच्या अगोदर माझं ठरलंय अन हनीमुन पण झालाय – जयकुमार गोरे

ब्राम्हण समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली पंकजा मुंडेंची भेट

भाजपच्या ‘या’ महिला नेत्याला फोडत राष्ट्रवादीने दिले भाजपला प्रत्युत्तर

भारताची पाकिस्तानला ऑफर, सफेद झेंडा घेऊन या दहशतवाद्यांचा मृतदेह घेऊन जा