नाशिक पोलिसांची भन्नाट कामगिरी; २०१७ वर्षात ५७ टक्के गुन्हे उघडकीस

नाशिक : शहरात एकीकडे चेनस्नॅचिंग, घरफोड्या, वाहनचोऱ्या होत असल्या तरी दुसरीकडे यातील गुन्हेगारांना शोधून त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलीस यशस्वी झाले आहेत. २०१७ या वर्षात शहर पोलिसांनी ५७ टक्के गुन्हे उघडकीस आणत यातील तब्बल सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल शोधून कोर्टाच्या आदेशाने तक्रारदारांना परत केला आहे. वाहने, ज्वेलरी, मोबाईलसह इतर मुद्देमालाचा यात समावेश आहे.

शहरात झालेल्या घरफोडी, चोरी, लूट, दरोडा तसेच चोरीच्या घटनांमध्ये चोरटे दागिन्यांसह पैशांवर डल्ला मारतात. वाहन चोरीतही नागरिकांना आर्थिक फटका बसतो. मुळात या गुन्ह्यांचे उघडकीस येण्याचे प्रमाण किंवा मुद्देमाल परत मिळण्याची शक्यता कमीच असते. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी अशा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा अधिक सक्रिय केल्या आहेत. या शाखा तसेच पोलीस ठाण्यांची गुन्हे शोध पथके यांच्या माध्यमातून मागील वर्षभरात 57 टक्के चेनस्नॅचिंग तसेच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

Rohan Deshmukh

मागील वर्षभरात पोलिसांनी यशस्वी तपास करीत गुन्हेगारांना जेरबंद करत त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 413 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर तात्काळ त्याची कार्यवाही पूर्ण करत न्यायालयाच्या आदेशाने तो फिर्यादींना परत देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे कामही केले. यामध्ये सर्वाधिक 45 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे. 62 लाख 95 हजार रुपये किमतीची वाहने, 4 लाख 77 हजार 900 रुपये किमतीचे मोबाईल तर 16 लाख 52 हजार 710 रुपयांच्या इतर मुद्देमालाचा समावेश आहे. शहरात गेल्यावर्षी चेनस्नॅचिंगच्या 102 घटना घडल्या. त्य8 गुन्ह्यांचा म्हणजे 57 टक्के गुन्ह्यांचा तपास लावण्यात आला. 2015 मध्ये हेच प्रमाण 24 टक्के होते. यावर्षी 101 गुन्हे झाले होते.

2016 मध्ये 118 गुन्ह्यांपैकी 36 टक्क्यांच्या सरासरीने 42 गुन्हे उघडकीस आले होते. घरफोडीसह इतर मालमत्तेचे आणि वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस यावेत यासाठी प्रयत्न सुरू असून त्यात हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाचे वाटप करण्यात आले आहे. 2017 मध्ये 10 जुलै आणि 14 ऑक्टोबर रोजी तसेच 6 जानेवारी 2018 रोजी झालेल्या कार्यक्रमांमध्ये हा मुद्देमाल फिर्यादींना सोपवण्यात आल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...