संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांंना विश्वास नांगरे पाटलांचा कठोर इशारा, म्हणाले…

vishwas nagre patil

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी देखील काही नागरिक सरकारच्या आदेशांचे उल्लंघन करत आहेत. अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी कठोर पाऊल उचलली   आहेत. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून संपूर्ण शहरावर  ड्रोनद्वारे प्रशासनाची  नजर असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, आपण आतापर्यंत युद्ध जिंकत आलो आहोत, यापुढेही आपण हे युद्ध जिंकू असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्वांना सहकार्य करावे.  तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. आतापर्यंत तब्बल ७७७ जणांवर संचारबंदीचा नियम मोडल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच नाशिकमधून दिल्लीत गेलेल्या २१ जणांपैकी १६ जणांची माहिती मिळाली असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसंच आपल्या कर्मचाऱ्यांना याची लागण होऊ नये म्हणून एक अॅपही विकसित करण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रशासन त्यांच्यावर नजर ठेवून आहे. क्वारंटाइन करण्यात आलेल्यांशी दिवसातून ३ वेळा व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संपर्क साधला जातो, अशी माहिती देखील विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी दिली.

दरम्यान संचारबंदीचे आदेश असताना  नाशिकमध्ये मोटार सायकलवर बसून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर देखील गुन्हे दाखल करण्याचे आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत. तर त्यांच्या गाड्या जप्त करण्याची कारवाई देखील करण्याचे आदेश दिले आहेत.