fbpx

त्यांच्या खिशात काय आहे हे आपल्याला कसे माहीत- गिरीश बापट

गिरीश बापट

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात युतीचे सरकार अगदी  स्थिरअसून  काळजी करण्याची गरज नाही. नारायण राणे मंत्रिमंडळात येतील आणि सरकारही आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये व्यक्त केला. मनासारखे झाले नाही की मित्रपक्षांकडून नाराजी व्यक्त होणे स्वाभाविक आहे, असे सांगत, कुणी आला गेल्याचा फरक पडत नाही, असा टोलाही बापट यांनी नाशिकमध्ये लगावला.
या सर्व पार्श्वभूमीवर बापट म्हणाले, की आमच्या सरकारने निवडणुकीपूर्वी जो जाहीरनामा दिला, त्यानुसार कामे सुरू आहेत. त्यामुळे जनतेचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. कुणी आले गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोला बापट यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला. सेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन तयार आहेत, याकडे बापट यांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र त्यांच्या खिशात काय आहे हे आपल्याला कसे माहीत असणार असा सवाल बापट यांनी उपस्थित केला.