मी सरकारचा संकटमोचक ; चंद्रकांतदादांनी थोपटून घेतली स्वतःची पाठ

टीम महाराष्ट्र देशा: सरकारवर काही संकट आले, की त्याची जबाबदारी माझ्यावर टाकली जाते. त्यामुळे मी संकटमोचक झालो आहे. संकटमोचनाच्या जबाबदारीमुळे मला बाहेर पडणे अवघड झाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडलो, असे सांगत राज्याचे सार्वजिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी आपलेच कौतुक करून घेतले आहे.

Loading...

महाराष्ट्र भाजपमध्ये ही जबाबदारी यापूर्वी जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर होती पण खडसेंची मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर हा भर चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर पडला आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरही त्यांचे निकटचे संबंध असल्यामुळे सरकारवर काही संकट आले तर त्यांच्यावर जबाबदारी दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रकांत पटील यांचा शब्द अंतिम मनाला जातो.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...