शरद पवारांवर राज ठाकरेंच्या शैलीची भुरळ ; शेतकऱ्याला बोलावले थेट मंचावर

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात लोकसभेचे वारे वाहत असताना सभांचा , प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडाला आहे. मात्र या सगळ्यांत राज ठाकरेंची शैली ही खूपच अनोखी असून, सभांमध्ये संबंधित व्यक्तींना थेट व्यासपीठावर बोलावणे या ठाकरे पॅटर्नला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या पॅटर्नची भुरळ आता खुद्द शरद पवारांना देखील पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाशिकच्या सभेत कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलावलं. सरकारच्या धोरणांना विरोध करत कृष्णा डोंगरे यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. हे सरकार बदलणार नाही तोपर्यंत शर्ट घालणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्याने घेतली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी या शेतकऱ्याला व्यासपीठावर बोलवत सरकारवर जोरदार टीका केली.