नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळांची मोर्चेबांधणी

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याची माहित मिळत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी सुरु आहे. नाशिक मतदारसंघात लक्ष केंद्रित करत समीर भुजबळ हे संपूर्ण नाशिक लोकसभा मतदार संघ पिंजून काढणार आहेत. त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुद्धा केली आहे.

समीर भुजबळ नाशिकमध्ये प्रत्येक गणनिहाय दौरा करणार आहेत. प्रत्येक पदाधिकार्याशी भुजबळ स्वतः बोलणार आहेत. कार्यकर्त्यांकडून माहित घेणार आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी झाडून कामाला लागले आहेत.

येत्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यातील जवळपास एकोणतीस पंचायतसमती गणात समीर भुजबळ स्वतः बैठका घेणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येक बूथ निहाय बैठका घेण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ हे इच्छुक असल्याने त्यांनी यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे सर्वच नेते संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेच्या कामात व्यस्त दिसत आहेत. प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक कामाला महत्व दिले जात आहे. गाठी-भेटी, बैठका यावर राष्ट्रवादीचा सध्या भर दिसत आहे.

You might also like
Comments
Loading...