Nashik Lok Sabha 2024 । नाशिकची जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळायला हवी, यासाठी नाशिककर आग्रही असल्याचा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. पण या निर्णयाला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत महायुतीमधील प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार असल्याचे भुजबळ म्हणाले.
नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे सांगत गिरीश महाजन यांनीही जागेवरून दावेदारी सोडलेली नाही. महायुतीत अटीतटीच्या संघर्षाने नाशिकच्या जागेचा पेच गुंतागुंतीचा बनला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या विरोधामुळे ही जागा हिसकावून घेण्याचे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनसुबे यशस्वी होतील की नाही ते गुलदस्त्यात आहे.
नाशिकची जागा शिवसेनेची आहे, लवकरच याबाबत निर्णय जाहीर होईल. ही जागा आम्हाला मिळाल्यानंतर कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
भाजपचे शहरात तीन आमदार आणि ७० नगरसेवक असल्याने नाशिक हा पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा गिरीश महाजन यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या