अंधश्रद्धेला गाडून लासलगावात 75 वर्षांत पहिल्यांदाच अमावस्येला कांद्याचा लिलाव सुरु

laslgav bajar samiti

नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समिती अखेर 75 वर्षांपासून अमावस्येला बंद ठेवले जाणारे बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव अखेर आजच्या अमावस्येला सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज पहिल्याच अमावस्येला लिलाव होत असून अंधश्रद्धेला मूठमाती देत बाजार समितीनेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

अमावस्येला कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर आजच्या पहिल्याच अमावस्येला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र अंधश्रद्धेला झुगारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याचे पहावयास मिळाले.

फटाकेची आतषबाजी करत कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले. 600 वाहनातील 13 हजार क्विंटल कांद्याला कमाल 2251 रुपये ,किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1800 रुपये इतका बाजार भाव मिळाला असल्याचं लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत 75 वर्षांपासून अमावस्येला कांद्याचा लिलाव बंद ठेवण्याची परंपरा अवलंबली जात होती. मात्र आजचा दिवस लासलगाव बाजार समितीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार हे नक्की.

महत्वाच्या बातम्या 

IMP