नाशिकच्या गिरणारे चौफुलीवर विजबिलाची होळी

नाशिक: गिरणारे ता. नाशिक येथील चौफुलीवर शेतकऱ्यांनीजाम आंदोलन केले. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून बैलगाडीसह शेती औजारे, या आंदोलनात ठेवण्यात आली होती. यावेळी शेतकरी आंदोलकांनी विजवितरण ने लादलेल्या हजारो रुपयांच्या विजबिलांची होळी केली. विशेषता रस्ता रोको सुरू असतांना आंदोलक शेतकऱ्यांनी एसटी महामंडळाच्या वाहक व चालकाचा श्रीफळ देऊन सत्कार केला,व कर्जमाफीच्या फसव्या योजनेच्या प्रकाराबद्दल सरकार विरोधात घोषणा देण्यात आली. या रस्ता रोको आंदोलना विरोधी घोषणां देत हरसूल, ठाणापाडा गुजरात सीमेकडून कडून येणारा मार्ग गिरणारे चौफुलीवर रोखून धरला, या शेतकरी आंदोलकांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन मंडल अधिकारी प्रफुल्ल कोटगीरे, तलाठी एस.पी.गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक एस.डी. परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल रोहन घायतड यांना देण्यात आले. या शेतकरी चक्का जामात शेतकरी संघटनांचे समन्वय अनिल थेटे, शेतकरी वाचवा अभियानाचे राम खुर्दळ, लहाणू पाटील थेटे यांसह परिसरातील शेतकरी, धरणग्रस्त, आळंदी उपसातील कर्जबाजारी शेतकरी, स्थानिक नागरिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.