नासाची ऐतिहासिक भरारी; यान सूर्याच्या दिशेने झेपावले

टीम महाराष्ट्र देशा :  खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सूर्याचा सर्वात जवळून अभ्यास करण्यासाठी नासातर्फे आज पार्कर सोलर प्रोब हे यान सोडण्यात आलं आहे. खरतरं हे यान काल अवकाशात झेपावणार होतं. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे ते आज अवकाशात झेपावल.

सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नासाने हे रोबोटिक यान पाठवलं आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप केनेरवल इथून हे यान प्रेक्षपित केलं गेलं. नासाला या महत्वाकांक्षी मोहिमेला तब्बल 1.5 अब्ज डॉलरएवढा खर्च आलाय.

नासाच्या या ऐतिहासिक मोहिमेमुळे मानवी इतिहासात प्रथम सूर्याचा एवढ्या जवळून अभ्यास करणे शक्य होणार आहे.

मुख्यमंत्र्याची कमिटमेंट सरकारी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच – जयंत पाटील

विभाजना संदर्भात विचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल- चंद्रकांत पाटील