भारताचा इंजिनिअर नासाच्या उपयोगी, विक्रम लँडरचे शोधले तुकडे

टीम महाराष्ट्र देशा : चांद्रयान 2 मधील विक्रम लँडरबाबत एक मोठे वृत्त समोर आले आहे. विक्रम लँडरचा अमेरिकेच्या नासाने शोध लावला आहे. चांद्रयानाच्या विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याची माहिती नासाने ट्विटरवरून दिली आहे. नासा मून या त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विक्रम लँडरच्या तुकड्यांचे फोटो ट्विट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतीय अभियंता शान उर्फ षण्मुगा सुब्रमण्यम यांनी या शोध कार्यात नासाची मदत केली आहे.

Loading...

7 सप्टेंबर 2019 ला ‘चांद्रायन 2’मधील ‘विक्रम’ लॅंडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात उतरविण्यात येणार होते. चांद्रभूमीपासून 30 किलोमीटर अंतरावर असताना पहाटे 1 वाजून 38 मिनिटांनी विक्रम लँडर उतरविण्याची प्रक्रिया सुरु झाली. ‘विक्रम’चा वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र चांद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा पृथ्वीवरील केंद्राशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोकडून विक्रमचा शोध घेण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले.

तर आता मदुराईचे शान यांनी विक्रम मून लँडर चंद्रावर नक्की कुठे आदळलं ती जागा शोधुन काढली. त्यासंदर्भातील माहिती त्यांनी नासाला दिली होती. त्यावर नासाने शोध मोहीम राबवली. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरने विक्रम लँडरचे हे फोटो टिपले आहेत. विक्रम लँडरच्या चंद्रावर ज्या ठिकाणी लँडींग होणार होते, तिथपासून 750 मीटर अंतरावर नासाला हे तुकडे सापडले आहेत. या फोटोत विक्रमचे तीन तुकडे दिसत आहेत. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यानं त्याचा पृष्ठभागावरील परिणाम या फोटोंमध्ये दिसून येत आहे. या परिणाम झालेल्या भागाला इम्पॅक्ट साइट असं नाव देण्यात आलं आहे. इस्रोने याबाबतची सविस्तर माहिती नासाकडे मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?