महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या घडणार या ‘तीन’ महत्वाच्या घटना

उद्यापासून अंबिका मातेच्या जागराला म्हणजेच नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होत आहे. याच बरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या वेगवेगळ्या तीन महत्वाच्या घटना घडणार आहेत.

१. सदाभाऊ खोत यांच्या नवीन शेतकरी संघटनेची घोषणा
पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे. मात्र, आता मंत्रीपद मिळाल्यापासून भाजपच्या वळचणीला गेलेले मंत्री सदाभाऊ खोत हे उद्या आपल्या नवीन शेतकरी संघटनेची स्थापना करणार आहेत. एकेकाळी खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून सदाभाऊ हे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढा देत. पण मंत्रीपद मिळाल्यानंतर सत्तेने त्यांच्यावर अशीकाही जादू केली कि थेट संघटनेशीच त्यांनी फारकत घेण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग संपला तो त्यांच्या स्वभिमानीतील हकालपट्टीने. आता सदाभाऊ खोत हे राजकारणाची नवीन इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या म्हणजेच घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते आपल्या नवीन शेतकरी संघटनेची स्थापना करणार आहेत.

२. नारायण राणे यांची ‘ती’ महत्वाची घोषणा
गेल्या काही दिवसांत कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले आणि भाजपच्या वाटेवर असणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे उद्या महत्वाची घोषणा करणार आहेत. कॉंग्रेसने सिंधुदुर्ग जिल्ह्याची राणे यांचा प्रभाव असणारी कार्यकारणीच बरखास्त करून टाकली. त्यामुळे खवळलेले राणे यांनी परवा कुडाळमध्ये मोठ शक्तीप्रदर्शन केल. या सभेत बोलताना त्यांनी कॉंग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठी घोषणा करणार असल्याच सांगितले होते. त्यामुळे आता नारायण राणे हे उद्या काय घोषणा करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

३. राज ठाकरेंच्या नवीन इनिंगची सुरुवात
विधानसभा, लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसेला सपाटून पराभवाला समोर जाव लागल आहे. त्यामुळे एकेकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असणारी मनसे चांगलीच पिछाडीवर गेल्याच दिसत आहे. राज ठाकरे हे हि राजकारणत सायलंट मोडवर गेल्याच दिसून आल. मात्र आता राज यांनी नव्या जोमाने उभारी घेण्यास सुरुवात केली आहे. यातील महत्वाचा टप्पा म्हणजे सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात. उद्या राज ठाकरे हे आपल्या फेसबुक पेजचा शुभारंग करणार आहेत. या माध्यमातून मनसेपासून दुरावलेल्या युवा वर्गाला पुन्हा आपल्याकडे खेचण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे.

You might also like
Comments
Loading...