fbpx

नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ समावेश तर होणारच

narayan rane and cm devendra fadanvis

मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशाला शिवसेनेकडून जोरदार विरोध केला जात आहे. मात्र, तरीही राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित मानला जात आहे. आज नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान राणें यांच्या मंत्रिमंडळ सहभागाची चर्चा झाल्याच बोलल जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आणि नितेश राणे यांची भेट सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भात शेतीच्या विषयावर झाली आहे. मात्र या भेटी दरम्यान राणे यांना मंत्रिपद देण्याला होणारा शिवसेनेचा विरोध आणि आगामी राजकीय खेळी बाबत चर्चा झाल्याच बोलल जात आहे.

दरम्यान काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याद्वारे राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला असणारा विरोध कळवला होता.