Share

Naresh Mhaske | “बोलक्या पोपटाला जे शिकवतो, तेच बोलतो”, सुषमा अंधारेंवर नरेश म्हस्केंचा खोचक टोला

Naresh Mhaske | मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर घणाघात केला आहे. एवढंच नाही तर म्हस्केंनी यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला होता

यावेळी, बोलक्या पोपटाला आपण जे शिकवतो, तेच तो बोलतो. त्याला अर्थ, निष्ठा, बांधिलकी, विचार यांच्याशी संबंध नसते, असे या बाईचे झाले आहे, अशी घणाघाती टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच, कालपर्यंत या बाई हिंदुत्वाच्या विरोधात बाळासाहेबांच्या तसेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलत होत्या. प्रभू रामचंद्रांच्या विरोधात तसेच हिंदू देवतांच्या विरोधातदेखील बोलत होत्या, असं देखील ते म्हणाले.

काल त्या कुराणातल्या आयत सांगत होत्या, आता त्या आम्हाला हिंदुत्व शिकवतात. दहीहंडीला उद्धव साहेबांनी आपल्या मुलाला खांद्यावर घ्यावं, असं चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वाच्या विरोधात अनेकदा भूमिका घेतली आहे. पण आता त्या बोलक्या पोपटासारख्या जेवढे बोलायचं, तेवढेच बोलतात, असा टोला म्हस्केंनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Naresh Mhaske | मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now