Naresh Mhaske | मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर घणाघात केला आहे. एवढंच नाही तर म्हस्केंनी यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला होता
यावेळी, बोलक्या पोपटाला आपण जे शिकवतो, तेच तो बोलतो. त्याला अर्थ, निष्ठा, बांधिलकी, विचार यांच्याशी संबंध नसते, असे या बाईचे झाले आहे, अशी घणाघाती टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच, कालपर्यंत या बाई हिंदुत्वाच्या विरोधात बाळासाहेबांच्या तसेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलत होत्या. प्रभू रामचंद्रांच्या विरोधात तसेच हिंदू देवतांच्या विरोधातदेखील बोलत होत्या, असं देखील ते म्हणाले.
काल त्या कुराणातल्या आयत सांगत होत्या, आता त्या आम्हाला हिंदुत्व शिकवतात. दहीहंडीला उद्धव साहेबांनी आपल्या मुलाला खांद्यावर घ्यावं, असं चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वाच्या विरोधात अनेकदा भूमिका घेतली आहे. पण आता त्या बोलक्या पोपटासारख्या जेवढे बोलायचं, तेवढेच बोलतात, असा टोला म्हस्केंनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Thackeray-Shinde | ठाकरे अन् शिंदे गट पुन्हा आमने-सामने!, ‘गद्दार’ची पुन्हा घोषणाबाजी
- Naresh Mhaske | “…अन् अशा लोकांना भेटायची वेळ आली”, आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर नरेश म्हस्केंचं टीकास्त्र
- Anil Parab | किरीट सोमय्या नारायण राणेंच्या घरी हातोडा का नेत नाहीत?, अनिल परबांचा खोचक सवाल
- Bhagatsingh Koshyari | शिवाजी महारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांना भोवणार?, पदावरुन हटवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल
- Hair Spa Tips | ‘या’ घरगुती पद्धती वापरून पार्लरला न जाता घरीच करा हेअर स्पा
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले