Share

Naresh Mhaske | “उद्धव ठाकरे यांचे आता केवळ ‘हम दो, हमारे दो”

मुंबई : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वेगवगळ्या ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होता. तर ठाकरे गटाचा शिवाजीपार्कवर होता. दोन्हीही गटांनी आपलं शक्तीप्रदर्शन दाखवलं. त्याचबरोबर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केल्या असल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले नरेश म्हस्के ?

बाळासाहेबांनी शिवसैनिकांचं रक्ताचं नातं निर्माण केलं. परंतू उद्धव ठाकरे यांनी काय परिस्थीती आहे, हे आपण मेळाव्यामध्ये पाहिलं.सख्खे भाऊ उद्धवजींना सोडून गेले आहेत. कोण आहे उद्धवजींबरोबर?,चुलत भाऊही नाहीयत. यांचं फक्त हम दो आणि हमारे दो, एवढंच मर्यादित आहे, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून हल्ला केला आहे. म्हस्के यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना म्हस्के म्हणाले की, यांना नातेसंबंध जोडता येतात का?, जेव्हा उद्धवजी व शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी राजकारण विसरून राजसाहेब त्यांच्यापाशी बसून होते. स्वतः गाडी चालवून त्यांना घरी घेऊन गेले. त्यानंतर राज साहेबांच्या मुलावर मोठी शस्त्रक्रिया झाली. हाकेच्या अंतरावर महापौर बंगला आहे. परंतु त्यांनी कधी चौकशी केली का?. राजकारण बाजूला ठेवून आपल्याला पुतण्या म्हणून त्यांनी कधी आस्थेने चौकशी केली का?. ती सोडा आता राज ठाकरेंवर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली त्यावेळी देखील उद्धवजी राज साहेबांना पाहिला गेले का? मला नाही वाटत त्यांनी फोन करून राज साहेबांना त्यांच्या तब्येत बाबत विचारलं असेल. यांना कोणाशीच घेणं देणं नाहीये. शिवसैनिकांचे देखील नाहीय.

तुमचे सल्लागार तुम्हाला बुडवायलाच बसलेत

उद्धवजी तुमचे सल्लागार आहेत ते तुम्हाला बुडवायलाच बसलेत त्यामुळे आपले कोण आणि परके कोण हे ओळखायला शिका, असंही ते म्हणाले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नातवावर केलेल्या वक्तव्यावरूनही नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर पलटवार केला असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वेगवगळ्या ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होता. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics