मुंबई : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वेगवगळ्या ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होता. तर ठाकरे गटाचा शिवाजीपार्कवर होता. त्याचबरोबर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केल्या असल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या मुलावर एक वक्तव्य केलं. बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि आता नातू नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या,असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरूनच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नरेश म्हस्के ?
उद्धव साहेब राजकारण करा, पण निरागस बाळाला यात ओढू नका. लहान मुलांना बोलणे कुठल्या हिंदुत्वात बसते, असा सवाल करत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. नरेश म्हस्के यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कार्ट.
आम्ही आदित्य ठाकरे यांना त्यांच्या लहानपणापासून पाहत आलोय. आता आदित्य ठाकरे आता मंत्रा झाले. आमदार झाले. त्यांची अशी कोणती कामगिरी होती?, त्यांनी असं काय काम केलं होतं पक्षात?,पण तुम्ही त्याला आमदार केलं. ही घराणेशाही नाहीया का?, असा सवाल म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तसेच, श्रीकांत शिंदे यांना तुम्ही कारटं म्हणताना, तुम्ही हा विचार केला का, त्यांना खासदारकीच तिकीट देताना त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आनंद परांजपे पक्ष सोडून गेल्यामुळे, त्याठिकाणी तगडा उमेदवार उभा करणं गरजेचं होतं. त्यामुळे आपण श्रीकांत शिंदे यांना खासदारकीचं तिकीट दिलं असल्याचं, नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवाचा उल्लेख केला. हे चुकीचं आहे. कारण राजकारणामध्ये आपण कोणत्या स्तरावर गेलो, याचं विश्लेषण जनता केल्याशिवाय राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती?, चंद्रकांत पाटलांचा खुलासा म्हणाले…
- Shivsena । विचारांचे सीमोल्लंघन आणि भोजनभाऊंची गर्दी!; शिवसेनेचा सामन्यातून हल्लाबोल
- Dasara Melava । उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य स्वित्झर्लंडमध्ये मजा करत होते; शिंदे गटाचा दावा
- Sudhir Mungantiwar | शिंदेंच्या दीड वर्षांच्या नातवाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Shivsena । एसटी बसेस बुक करण्यासाठी 9 कोटी 99 लाख कोणी भरले?; दानवेंचा शिंदे गटाला सवाल